Uncategorized

आदत

यूँ तो तेरी आदत हो चली है जिंदगी,
इन रुकती ठहरती नजरों का हर अंग पर झांकना,
इन बेबस हवस भरी आँखों का बदन के पार जाना!
कभी यूँ लगा था के हवा हो जाऊं तो छूने वाले हर हात को नजर ही नहीं आती में!
और शायद एक इंसान होने का दर्द औरत होनेसे ज्यादा हो जाता…
हम कुछ अंगोसे भिन्न है बस,
पर सोचा जाए तो नज़रिये का फासला इतना ज्यादा है के दुनिया के खत्म होते आसमां भी जमीन से मिल जाए…
तब “ना” केहना आसान था, शायद उतनाही हाथमेंभी था, पर दुनिया ने “ना” सुनने पर कोई नतीजा नहीं निकला, हालांकि सबसे ज्यादा मुश्किल बात तो “ना” सुनना है!
दुपट्टे का बोझ शायद बढ़ जाता होगा,
इज्जत के अश्क वो रोज रोता है!
कमीज के हर सिलाई पर दर्जी ने मेरी स्वतंत्रता को जकड़े रखा है वैसे तो,
पर शायद किसीको आंखों में बसी हवस के बारेमें पता ही नहीं है!
मैंने अपने सिने में ममता से ज्यादा इन्ही ऑंखोंको मरोड़े रखा है,
जिनको आजभी कुचल देने का जी करता है!
जिंदगी अब तेरी आदत हो रही है,
नुक्कड़ की नजरे जब मुझे दबोचने को मचल उठती है,
तब उन आंखों में बसी दरिन्दगी को उसी चौराहे पर में मरोड आती हूं,
कमीज से सारी रेषाएँ तोड़ कर जी उठती हूं!
दुपट्टे को अब मैंने कानून के आंखों पर बंधे देखा है,
जहाँ तराजू सीधा तो है पर हात बिलकूल शरीर के पास!

#कृत्तिका
13/04/2018

मनावर होणारे बलात्कार वाईट असतात! बाई ला ती बाई आहे त्या पेक्षा माणूस आहे म्हणून जगणं जास्त गरजेचं आहे.

कविता

जिगसॉ

त्या परफेक्ट फॅमिली पिक्चर मध्ये न बसणारा जिगसॉ चा माझ्या नावचा एक तुकडा,
आणि
मग मी करत जाते स्वतःचाच अमिबा
पण
स्वतःच्याच विलगिकरणातून निर्माण झालेला अदर सेल्फ
त्याचं काय स्पष्टीकरण देता येऊ शकतं?
कधी कधी वाटतं स्वतःवर लिपलेले असे नवनवीन लेयर खरडून टाकावेत….
आणि मग वाटावं, माझं काळीज सुद्धा वेगवेळ्या रंगानी रंगवलेल्या रंगपंचमीच्या सणासारखं होतंय…
हळूहळू
हळूहळू मग मी वाचते उद्विग्नता की नग्नता पुढच्याच्या डोळ्यात…
उगाच मनाला फसवण्यासाठी,
की आता अपेक्षा फोल ठरतीलच…
आणि तेव्हाच कोणी येतो आणि बोट धरून मला चालवू लागतो….

-कृत्तिका
05/04/22

कविता

तळहात

कोणाच्या तळहाताच्या रेषा कधी मिस केल्यात?
असं कसं एखाद्या रेषांवर आपल्या रेषा फिट बसतात
आणि मग आपण होतो त्यांच्या सुखदुःखाचे भागीदार.
आपलं काम फक्त त्या बारीक फटी भरून काढणं इतकंच!
बाकी एखादी रेष नसेल सारखी तर तिचा करायचा सिनेम्यासारखा तुटता तारा
आणि नव्या तारा छेडत रहायच्या
हात मात्र अलगदच धरायचा…
समुद्राची रेती, पावसाचं पाणी, कोवळ्या उन्हाचा कवडसा यांनी तिथे घरं करायला हवीत
नाहीत तर रेषांवर नात्यांची बुरशी साठू लागेल हळूहळू
अलवार अशा रेषांमध्ये मग उपभोगायचं स्वातंत्र्य एकत्र असण्याचं
आणि मग सहज एके दिवशी सगळ्याच रेषा जेव्हा अस्पष्ट होतील
तेव्हा दुसऱ्या समांतर जगात शोधायचा एक हात जो आपले तळहात मिस करत असेल..

-कृत्तिका
31/05/2021

Uncategorized

(ति)(शी)

एखाद्या स्लीवलेस ब्लाउजच्या खांद्यावर झुलणाऱ्या पदरासारखा,
हलका हलका पाऊस मोरपंखासारखा…
आणि आभाळच लपेटून घेतल्यासारखी ती!
तिच्या खांद्यावरचा बहर कुठे दूर पश्चिमेला मावळल्यासारखा…
रंग मावळतीचे तिच्या चेहऱ्यावर तिशीसारखे,
आणि कुठे तारा तुटतो कुठल्याशा फाईन लाईन सारखा…
त्याला किती इच्छा सांगितल्या तिने, त्याने इंप्रिंट सोडल्यासारखे…
मधेच चांदण्या मुजोर अंधारातून डोकावणाऱ्या…
आणि ती कुठल्याशा खड्ड्यातल्या चंद्रासारखी,
शांत स्लीवलेस ब्लाऊजच्या शेवटच्या हुका सारखी…
हल्लीच तिची झालेली रातराणी, चाफ्याच्या
सौन्दर्याची…

-कृत्तिका
07/09/2020

Uncategorized

समांतर

नदीला काठोकाठ भरून नेणाऱ्या समांतर रेषा पहिल्या,
की जाणवतं आपणही कोणाबरोबर अशी किती समांतर आयुष्ये चालतो.
आपल्या आत भरलेल्या सगळ्याच गोष्टी त्या नदीत सोडून देतो.
पण किनाऱ्याला झळ पोहोचतेच,
कारण
वादळं येतात तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान किनाऱ्याचं होतं!
पण मग हे असे बांध पण घालता येत नाहीत.
मग नदीचा समुद्र करायचा
त्याची विशालता घ्यायची आणि मरीन लाईन्स सारखे ओंडके पुरायचे काळजात!
प्रत्येक श्वासागणिक एखादी लाट ठोकतेच..
पण ती किनाऱ्याच्या अलीकडेच थोपवायची.
वर वर बसनाऱ्यानं मजा पहायची…
कारण छोटी छोटी वादळे अशीच परतून जातात,
पण त्सुनामी साठी मात्र मग मन घट्ट घट्ट ठेवायचं.
स्वतःला पुन्हा प्रवाहात स्वाहा करण्यासाठी!

-कृत्तिका
3/7/2020

Uncategorized

कादंबरी

Picture Source: Pixel

एखाद्या बरोबर मधोमध येऊन वाचन सुटलेल्या कादंबरी सारखा तो,
म्हणजे ऐन वेळी पान दुमडून ठेवायचं नाही ही सवय सुद्धा त्रासदायक!
पण कधीतरी काम मागे लागलं की तुला सोडून जाण्याशिवाय पर्याय नसेल.
मग बुकमार्क म्हणून तू माझे तुझ्यावरचे फिंगरप्रिंट्स लक्षात ठेव!
अर्धवट राहीलोय मी म्हणून कपाटातून किंवा टेबलवरून मला सतत हाक मार.
माझा जीव अगदी कासावीस व्हावा, विरह सहन न व्हावा असा जीव घायकुती ला यावा!
पण अर्धवट राहिलेल्या कादंबऱ्यांची सुद्धा मजा असते न? 
एखाद्या नायका सारखं तुझं येणं वावरणं,
आणि मग मला झपाटून टाकणं.
रात्री अपरात्री झोपेतून उठून सुद्धा माझं तुझ्यासोबत असणं.
काही कादंबऱ्याच मुळात कमाल असतात. प्रत्येक पानावरच्या पुर्णविरामांचे आयुष्यात उमटणारे स्वल्पविराम
आणि मग एखाद्या पूर्ण झालेल्या कादंबरी सारखा तो
फेव्हरेट म्हणून शेल्फ वरच्या पर्सनल कलेक्शन ला ऍड होतो
जी कादंबरी मी कोणालाच वाचायला म्हणून देत नाही!

-कृत्तिका